logo

साध्या विवाहांचे प्रतीक निरंकारी सामूहिक विवाह 77 जोडपी विवाहबद्ध


साध्या विवाहांचे प्रतीक निरंकारी सामूहिक विवाह
77 जोडपी विवाहबद्ध
महाराष्ट्रातील जोडप्यांचाही समावेश
समालखा, 3 नोव्हेंबर, 2023:- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात गुरुवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 77 जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी सद्गुरु माताजींनी नवदांपत्याना गृहस्थ जीवन जगत असताना भक्ती करण्याचा आशीर्वाद दिला. त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय व्हावे यासाठी त्यांच्या कुटुंबियांनादेखील शुभेच्छा दिल्या.
संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे तयार करण्यात आलेल्या विशाल पंडालमध्ये हजारो निरंकारी संतांच्या उपस्थितित देश विदेशातील जोडपी विवाहबद्ध झाली. निरंकारी राजपिताजी यांचे बंधू रोहन चांदनाजी यांचा विवाह यूनायटेड किंग्डम येथून आलेल्या पूर्वा साहनी यांच्याशी अगदी साध्या पद्धतीने याच सामूहिक सामूहिक विवाह सोहळ्यात संपन्न झाला.
या साध्या पद्धतीनुसार पारंपारिक जयमाला आणि निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझाहार (सामायिक हार) देखील प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात मिशनच्या प्रतिनिधीं मार्फत घालण्यात आला. निरंकारी लांवा (मंगलाष्टका) दरम्यान सद्गुरु माताजींनी वधू-वरांवर पुष्प वर्षाव करुन आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. त्याबरोबरच वधूवरांचे कुटुंबिय, नातलग आदिंनीही वधूवरांवर पुष्पवर्षाव केला. निश्चितच हे एक दृश्य होते.
या शुभ प्रसंगी पर अवघ्या भारतवर्षातील वेगवेगळ्या राज्यांतून आणि विदेशातून आलेल्या 77 जोडप्यांमध्ये मुख्यत: दिल्ली,  गुजरात,  हरियाणा,  हिमाचल प्रदेश,  महाराष्ट्र,  मध्य प्रदेश,  ओडिशा,  पंजाब,  राजस्थान,  उत्तराखंड,  उत्तर प्रदेश राज्य तसेच संयुक्त अरब अमिराती व इंग्लंड येथील जोडप्यांचा समावेश होता. सामूहिक विवाह समारोहानंतर सर्वांच्या भोजनाची उचित व्यवस्था संत निरंकारी मिशनमार्फत करण्यात आली होती.
नव विवाहित दांपत्यांना आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की भक्ति करत असतानाच गृहस्थ जीवनात राहणे हीच मोठी तपस्या आहे. वर्तमान परिवेषामध्ये गृहस्थ जीवनात प्रत्येक महिला व पुरुष यांनी समान योगदान देणे गरजेचे आहे.
सद्गु: माताजींनी नवदांपत्त्यांना आपला पावन आशीर्वाद प्रदान करुन त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगल कामना केली

18
685 views
  
1 shares